राजगड, स्वाराज्याची पहिली राजधानी. जवळ जवळ 20 वर्षे महाराज्यांच्या रुपान आख्या महाराष्ट्राची कमान संभाळली असा निर्भिड, निधड्या छातीचा किल्ला. ज्याला पायथ्या पासून पाहताच मानत धड़की भरते असा गड. महाराज्यांनी स्वतः कल्पना लढवून हा किल्ला बांधला तो म्हणजे तोरणाची डागडुजी करत असताना जे सात सोन्याचे हंडे गुप्तधन सापडला त्यामधून. काल अचानक मित्रांचं बोलावणं आला आणि गेलो परत एकदा भेटीला त्या राजबिंड्या अमर, अजस्त्र कलाकृतीला.
पुण्यामधून सकाळी ६:३० ला राज-गडाकडे प्रस्थान केला. सिंहगड रोड-खानापूर-पाबेघाट मार्गे निघालो. तसा पाबेघाट हा निसर्ग सौन्दार्याने भरलेला आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची नजर न लागलेला एकमेव पुण्या जवळचा घाट. घाटाच्या माथ्यावर गेल्यावर आपल्याला ट्रेकर्स ची तीन श्रद्धास्थानं एकाच जागेवरून पाहायला मिळतात: पाठिमागे अजस्त्र सिंहगड, उजव्या बाजूला गगनचुंबी तोरणा आणि डाव्या बाजूला निधडा राजगड. पाबे-घाट संपल्यावर आम्ही वाजेघर-साखर मार्गे गठाल ते गुंजावणे. अगदी छोटासा खेडं. अगदी महाराज्यांपासून आज पर्यंत राजगड आणि गडकर्यांची सेवा करत असलेला गाव. इथले गावकरी आज हि छोटी-मोठी हॉटेल्स चालवतात पण अडचणीच्या नावाखाली लुटत मात्र अजिबात नाहीत, नाहीतर एक सिंहगड सगळे लुटायलाच पाहतात.
तसं पाबेघाट मार्गे पोहचायला वेळ लागतो पण तो एक वेगळाच अनुभव आहे. ९:३० ला पोहोचल्यावर चढाई ला सुरवात केली. तसा अडीच तासात सर केला. जाताना गुंजावणे गावातून चोर-दरवाज्या मार्गे जावं. अजून एक रस्ता आहे पण तो खूपच अवघड समजला जातो.चे गुएवेरा चा आदर्श राखून एक हि थेंब पाणी न पिता गड चढण्याच समाधान विलक्षण असता.गेल्या-गेल्या पहिल्यांदा दर्शन मिळाला ते सध्याच्या काळातील गडकरी असलेल्या वानरसेनेच आणि नंतर पद्मावती देवीचं. तसा पाहायला गेला तर हा गड खूपच मोठा आहे, आणि याच्या तिन्ही माच्या इतर दोघींपासून खूपच दूर अंतरावर आहेत. पूर्ण गड किती वेळेत आणि काय काय पाहायचा याचा पूर्ण नियोजन करून पहिल्यांदा निघालो ते सुवेळा माची-कडे. सुवेळा माची कडे जनता मध्येच एक भूल-भुलैया सारखा ठिकाण लागतं, थोडा खाली उतरल्यानंतर कळत की तो गुंजावणे दरवाजा आहे. बहुतेक गुंजावेन गावातून जो अवघड रस्ता राजगडावर जातो त्याचा हा गडावरचा
बहुतेक गुंजावेन गावातून जो अवघड रस्ता राजगडावर जातो त्याचा हे गडावरच प्रवेशद्वार असावा. परत आम्ही कूच केली ती सुवेळा माची-कडे. सुवेळा-माची च्या थोडा आधी डाव्या हाताला वरती पहिला असता आपल्याला कातळात एक खूप मोठा छिद्र दिसत. तिथे जाता आलं तर नक्की जावं. सुवेळा माची पाहिल्यानंतर आम्ही परत पद्मावती माची कडे आलो आणि कूच केली ती बाले-किल्ल्याकडे. राज-गडाचा मुख्य आकर्षण म्हणजे हा बालेकिल्ला. संपूर्ण कातळात घडलेला, एकच वाट असलेला आणि आजही जिंकायला अशक्य वाटावा असा हा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावर पाहायला आता फक्त राजवाड्याचे अवशेष राहिले आहेत, तसेच पाण्याची दोन टाकीही आहेत. तसा चढायला अवघड आणि धोकादायक वाटणारा बालेकिल्ला उतरताना तितका अवघड वाटला नाही.
आता वेळ परतीची झाली होती. शिवाजी महाराज्यांच नवा घेऊन आम्ही खालती कूच केली ती 4:30 वाजता. आता मात्र पूर्ण दिवस पाण्यात नाहलेला आणि १००-१५० ट्रेकर्सच्या पायाखाली धूळधान झालेला रस्ता खूपच निसरडा झाला होता. जराही चूक झाली आणि पाय घसरला किंवा लाचाकाला तर पाय किमान २-३ दिवसांसाठी कामातून जाण्याची शक्यता होती. जाताना वरती चढताना जितकी काळजी घेतली नव्हती तितकी उतरताना घ्यायला लागत होती ती फक्त या निसरड्या रस्त्यामुळे. बहुदा हा माझा पहिलाच ट्रेक होता जिथे चढण्यापेक्षा उतरताना वेळ जास्त लागला. उतरल्यानंर मस्त पैकी चहा आणि पोह्यावर तव मारल्यानंतर आत्मा तृप्त झाला. आणि संध्याकाळी ७:३० वाजता पुण्याकडे प्रयाण केलं ते मात्र महाराजांची मनात परवानगी घेऊनच.

No comments:
Post a Comment